गोंदिया टू हैद्राबाद भरारी घ्या ३ हजार रुपयात, इंडिगो’ने जाहीर केले वेळापत्रक

गोंदिया – हैदराबाद- तिरुपती प्रवासी विमानसेवा आता १ डिसेंबरपासून

गोंदिया : जिल्हातील बिरसी विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवेला १ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. दरम्यान, गोंदिया- हैदराबाद तिरुपती प्रवासी विमान वाहतूक सेवेला प्रारंभ होणार आहे. ही विमान वाहतूक सुरू झाल्याने जिल्हावासीयांना दिवाळीची भेट मिळाली असून प्रवाशांमध्ये सुद्धा आनंदाचे वातावरण आहे.

इंडिगोच्या वेळापत्रकानुसार तिरुपतीवरून सकाळी ८:४० वाजता उड्डाण घेईल. तर हैदराबाद येथे सकाळी ९:५० वाजता पोहोचेल, त्यानंतर हैदराबादवरून सकाळी १०:२० वाजता गोंदियासाठी उड्डाण भरेल व गोंदियाला दुपारी १२:३५ वाजता पोहोचेल. तर गोंदिया विमानतळावरून विमान क्रमांक ६ ई ७२६३ हा दुपारी १२:५५ वाजता हैदराबादसाठी उड्डाण भरेल. तिरुपती या विमानसेवेला हैदराबाद येथे दुपारी २:५५ वाजता पोहोचेल. त्यानंतर हेच विमान दुपारी ३:२५ वाजता तिरुपतीसाठी उड्डाण घेईल आणि सायंकाळी ४:५० वाजता तिरुपतीला पोहोचेल. इंडिगो विमान कंपनीने हे वेळापत्रक जाहीर करीत त्यासाठी तिकीट बुकिंगला सुद्धा सुरुवात केली आहे. त्यामुळे जिल्हावासीयांसाठी निश्चितच आनंदाची बाब आहे.

गोंदिया ते हैदराबाद 2999/- आणि गोंदिया ते तिरुपती 4965/- तिकिटाचे दर असून बुकिंग ला सुरुवात झाली आहे.

इंडिगो विमान कंपनीने १ डिसेंबरपासून बिरसी विमानतळावरून प्रवासी वाहतूक सेवेला प्रारंभ करीत असल्याचे जाहीर करीत त्याचे वेळापत्रकसुद्धा जाहीर केले आहे. गोंदियाहैदराबादगोंदिया- तिरुपतीदरम्यान सेवा सुरू केली जाणार आहे. या दोन्ही ठिकाणी दररोज विमानसेवा असणार आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यासह लगतच्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यांतील भाविकांना तिरुपती येथे दर्शनासाठी जाण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. विमान क्रमांक ६ ई ७५३४ हा इंडिगो कंपनीने तूर्तास गोंदिया-हैदराबाद- तिरुपती या मार्गावर प्रवासी विमान सेवेचा प्रारंभ करण्याचा निर्णय घेतला आहे. तर लवकरच बिरसी विमानतळा- वरुन मुंबई-पुणे- छत्रपती संभाजीनगर या मार्गावरसुद्धा या सेवेला प्रारंभ करण्याचे संकेत कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे. या मार्गावर विमानसेवा सुरु झाल्यास प्रवासी संख्येत वाढ होवून रोजगारच्या संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या दृष्टीकोनातून हे फार महत्वपुर्ण मानले जात आहे. त्यासाठी विमानसेवेला प्रारंभ करण्याची मागणी जिल्हावासीयां- कडून केली जात होती.

Share