देवरी ❗️शेतातील धानाची पाहनी करण्यास गेलेल्या व्यक्तीची मोटार सायकल लंपास
देवरी ◼️ तालुक्यातील लोहारा येथील प्रकरण अशा प्रकारे आहे की, दिनांक १६ / १० / २०२३ चे ०७:४५ ते ०८:०० वा. दरम्यान यांतील फिर्यादी किशोर महारू कावरे, वय ३२ वर्षे, रा. लोहारा, ता. जि. गोंदिया हे आपले मोटार सायकलने आपल्या शेतातील धानाची पाहनी करण्यास गेले व आपली मोटार सायकल लोहारा गावाजवळील टोल नाक्याजवळ रोडावर उभी ठेउन आपल्या शेतातील धानाची पाहणी करून आपण ठेवलेल्या ठिकाणी परत येउन आपली मोटार सायकल क्र. एम. एच ३५ / एपी ४०२९ किंमती अंदाजे ३०,००० /- रूपये किंमती ची ठेवलेल्या ठिकाणी पाहणी केली असता मोटार सायकल – दिसुन आली नाही. फिर्यादीची मोटर सायकल कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेल्याने व फिर्यादीने आपले मोटर सायकलचा इतरत्र शोध घेतला असता मिळुन न आल्याने फिर्यादी चे तोंडी रिपोर्टवरून पोस्टे देवरी येथे अप क्र. ३७६ / २०२३ कलम ३७९ भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास पोहवा / ८७८ गायधने पोस्टे देवरी, हे करीत आहेत.