ब्लॉसम स्कूलच्या चिमुकल्यांची इंद्रप्रस्थ अग्रो फार्मला भेट
देवरी◼️ स्थानीक ब्लॉसम स्कुलच्या विध्यार्थ्यांनी प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांच्या संकल्पनेतून इंद्रप्रस्थ अग्रो फार्मला भेट दिली. यावेळी मार्गदर्शक म्हणून इंद्रप्रस्थ अग्रो फार्मचे संचालक डॉ, अनिल चौरगडे उपस्थित होते. यावेळी पर्यावरणातील रोपट्यांचे आणि वृक्षांचे महत्त्व याविषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सेंद्रिय शेती, आधुनिक शेती, फलोत्पादन , पर्यावरण शिक्षण या विषयावर सदर भेट आयोजित करण्यात आलेली होती रोपवाटिकेत वाढविलेल्या सर्व जातीच्या रोपांचे आणि वृक्षाची माहिती सांगण्यात आली. सदर भेटी दरम्यान विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात कृषिविषयक आणि रोपवाटिकेत एक अनोखा अनुभव घेतला. सदर इंद्रप्रस्थ अग्रो फार्मला यशस्वी भेटीसाठी सहायक शिक्षिका मनीषा काशीवार, कलावती ठाकरे, प्रियांका आंबिलकर यांनी सहकार्य केले.