प्राथमीक आरोग्य केन्द्रात चोरी करणाऱ्या चोरट्यांना अटक; 1,35,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त

गोंदिया ◼️ दिनांक- 30-10-2023 ते 31-10-2023 रोजी चे 07. 30 वाजता दरम्यान तक्रारदार डॉ. सलील पाटील रा. राजाभोज कॉलोनी मरारटोली, गोंदिया यांनी प्राथमीक आरोग्य केन्द्र कुंभारेनगर, गोंदिया हे आपले निवासस्थानी हजर असतांना अज्ञात आरोपीने आरोग्य केन्द्राचे दार तोडुन आरोग्य केन्द्रामधील 1) एच. सी. एल. कंपनीचे 3 मॉनिटर, 2) ऍसेस कंपनीचे 3 सि.पी.यु. असा एकुण 75,000/-रू. चा मुद्देमाल चोरून नेल्याचे तक्रारीवरून पोलीस ठाणे गोंदिया शहर येथे गुन्हा रजि. क्र. 704/2023 कलम 454,457,380 भा.दं.वि. अन्वये अज्ञात चोरट्याविरोधात दाखल करण्यात आलेला होता.

निखील पिंगळे, पोलीस अधिक्षक, गोंदिया, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, यांनी सदर गुन्ह्याचे अनुषंगाने सर्व ठाणेदार गोंदिया जिल्हा यांना दिलेल्या निर्देश सुचनेप्रमाणे सुनिल ताजणे, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग गोंदिया, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गोंदिया शहरचे पो.नि. चंद्रकांत सुर्यवंशी यांचे आदेशान्वये गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदार यांनी गोपनिय माहिती तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशया वरून आरोपीत ईसंम नामे- उदय ऊर्फ आऊ उमेश उपाध्याय, वय- १९ वर्षे, रा. मुर्री चौकी समोर गोंदिया, धम्मदीप अनिल गजभिये, वय- १९ वर्षे, रा. कुंभारेनगर, ठाकुर आटा चक्कीजवळ, गोंदिया यांना ताब्यात घेण्यात आले.

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना विश्वासात घेऊन कसोशिने तपास करून त्याचेकडुन गुन्ह्यात चोरी गेलेला मुद्देमाल – एस.सी.एल. कंपनीचे 03 मॉनीटर, किमंती 45,000/-, ऍसेस कंपनीचे 03 सी. पी. यु. किंमती 30,000 /- रु. तसेच हिरो एक्सट्रीम गाडी क्र. एम. एच. 35 ए. एम. 6426  किंमती अंदाजे 60,000/- रू. असा एकुण 1,35,000/- रुपयांचा मुद्देमाल गुन्ह्यांत हस्तगत करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयाचा तपास पोहवा जागेश्वर उईके हे करीत आहेत.

सदरची कारवाई मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गोंदिया शहरचे पोलीस निरिक्षक चंद्रकांत सुर्यवंशी, यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकाचे स.पो.नि. सागर पाटील, पो.हवा. जागेश्वर उईके, कवलपालसिंग भाटीया, सुदेश टेंभरे, सतिश शेंडे, प्रमोद चव्हाण, दिपक रहांगडाले, मपोहवा. रिना चौव्हाण, पोशि. दिनेश बिसेन, मुकेश रावते, कुणाल बारेवार, अशोक रहांगडाले, सुभाष सोनवाने यांनी केलेली आहे.

Share