जिल्हा परिषदेतील परिचर बदली प्रकरणात ककोडीच्या वैद्यकीय अधिकार्यांचा पत्रव्यवहार संशयास्पद

◼️प्रशासकीय अधिकार नसतांना ककोडीच्या एमओनी दिलेले पत्र प्रशासनाने कसे धरले गृहीत

गोंदिया- जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागात कार्यरत परिचर पदावरील कर्मचारी नितीन रामटेके यांची प्रशासकीय बदली देवरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र ककोडी येथे झाली.तर ककोडी येथील आरोग्य केंंद्रातील कार्यरत कर्मचारी शेंडे यांची बदली ही जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागात करण्यात आली.शेंडे हे ककोडी येथून कार्यमुक्त होऊन बदलीच्या ठिकाणी रुजू झाले.मात्र बदली होऊन एक महिन्याच्या वरील कालावधी लोटूनही बदलीच्या  ठिकाणी रामटेके हे रूजू झाले नाही.दरम्यानच्या काळात याच आरोग्य केंद्रात 2 ऑगस्टला एक कर्मचारी रुजू झाल्याची माहिती तेथील वैद्यकीय अधिकारी हे 17 ऑक्टोंबर 2023 रोजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.गोंदिया यांना पत्र देऊन परिचर नितिन रामटेके यांना अतिरिक्त होत असल्याचे कारण देत रुजू करता येत नसल्याचे पत्र दिले आहे.तर दुसकीकडे 2 आँगस्टला रूजू झालेल्या कर्मचारीची माहिती स्थानिक वैद्यकीय अधिकारी हे 19 ऑक्टोंबरला पत्राद्वारे कळवित असल्याने या आरोग्य केंद्रातील प्रशासकीय कारभार चव्हाट्यावर आलेला आहे.विशेष म्हणजे ककोडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रशासकीय व आर्थिक कामकाजाचे अधिकार हे तालुका वैद्यकीय अधिकारी श्री कुकडे यांच्याकडे असतांना स्थानिक दोन्ही कंत्राटी वैद्यकीय अधिकारी यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करीत तसेच प्रशासकीय अधिकार नसतांना व तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या निदर्शनास सदर माहिती न आणताच जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाशी सरळ पत्रव्यवहार केल्याने या आरोग्य केंद्रातील कामकाजाचा गोंधळ समोर आलेला आहे.

विशेष म्हणजे प्रशासकीय कामकाजाचे अधिकार नसतांना या दोन्ही वैद्यकीय अधिकारी यांनी स्वतःच्या हस्ताक्षराने दिलेले पत्र खरे की खोटं हा प्रश्न निर्माण झालेला असून ऑगस्ट मध्ये कर्मचारी रूजू झालेला असताना ऑक्टोंबरमध्ये माहिती देण्याचे कारण काय या कालावधीत ही माहिती का लपवली गेली असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत.

सामान्य प्रशासन विभागातून आँगस्ट महिन्यात बदली प्रकिया पार पडली.त्यानंतर २१ ऑगस्ट रोजी परिचर नितिन रामटेके यांना कार्यमुक्त करण्यात आले.पण सदर कर्मचारी त्या ठिकाणी रुजू होण्यास गेले की नाही हे अद्यापही प्रश्न कायम असून ते मधल्या काळात वैद्यकीय रजेवर गेलेले असताना रुजू होतांना त्यांनी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करुन परत जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागात रूजू झाले की कुठल्या आधारावर ते रूजू होऊन हजेरीपत्रकावर स्वाक्षरी करीत आहेत असे अनेक प्रश्न ककोडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद््यकीय अधिकारी ज्यांना प्रशासकीय अधिकार नसतांना दिलेल्या पत्रामुळे गोंधळ उडालेला आहे.
सीईओ साहेब एकीकडे कुणाचीही तक्रार नसतांना आणि व्यवस्थित काम सुरु असतांना एका कर्मचाèङ्माची प्रशासकीयच नव्हे तर विनंती बदलीही झालेली नसतांना मुख्यालयात त्वरीत सेवासंलग्नता करुन घेत रुजू न झाल्यास कारवाईचा इशारा देतात.मात्र दुसरीकडे प्रशासकीय बदलीनंतरही सदर कर्मचारी महिना लोटूनही बदलीच्या ठिकाणी रूजू व्हायला टाळाटाळ करीत असतांना प्रशासन गप्प का अशा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Share