गोंडवाना आदिवासी सांस्कृतिक सभागृहाचे लोकार्पण संपन्न
देवरी ◼️येथील गोंडवाना आदिवासी सांस्कृतीक सभागृहाचे लोकार्पण सोहळा डॉ. विजयकुमार गावित मंत्री, आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य हस्ते व अशोक नेते खासदार, लोकसभा क्षेत्र गडचिरोली-चिमुर यांचे उपस्थीत संपन्न झाला
ए. आ.वि. प्रकल्प एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी,जि गोंदिया च्या वतीने जिल्हा वार्षीक आदिवासी उपयोजना अंतर्गत देवरी येथील गोंडवाना आदिवासी सांस्कृतीक सभागृहाचे बांधकाम मागील एक ते दिड वर्षात काम पुर्ण करुन आज २७ ऑक्टोबर, २०२३ रोजी लोकार्पण सोहळा संपन्न झाला .
या लोकार्पण सोहळा कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विकास राचेलावर प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी,जि गोंदिया यांनी आदिवासी समाजासाठी स्वतंत्र सांस्कृतीक तसेच विविध कार्यक्रम आयोजित करता येईल या करीता सांस्कृतीक सभागृहाचे बांधकाम पुर्ण करुन लोकार्पण करण्यात येत आहे यांचा मला अत्यंत आनंद होत असुन यापुढे सुध्दा प्रत्येक तालुकास्तरावर आदिवासी समाजासाठी सांस्कृतीक सभागृह ची आवश्यकता असुन मंत्री महोदय यांनी निधी मंजूर केल्यास इतर तालुक्याच्या ठिकाणी सुध्दा सांस्कृतीक सभागृहाचे बांधकाम करता येईल अशी विनंती केली. अशोक नेत, खासदार यांनी आपल्या भाषणामध्ये मंत्री महोदय यास क्षेत्राचा सर्वागीन विकास होण्यासाठी तालुका स्तरावर व जिल्हा स्तरावर आदिवासी सांस्कृतीक सभागृह मंजूर करणेकरीता व निधी उपलब्ध करणेकरीता माझ्या वतीने मंत्री महोदय यांना विनंती करीत असुन प्रत्येक तालुका स्तरावर व जिल्हास्तरावर आदिवासी सांस्कृतीक सभागृहची निर्मीतीची आवश्कता आहे जेणेकरुन आदिवासी समाज बांधवास सभागृहामध्ये कार्यक्रम करणेकरीता सोईचे होईल असे सांगीतले.
अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ. विजयकुमार गावित मंत्री, आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य यांनी आदिवासी विकास विभाग मार्फत आदिवासी समाजाचा सर्वागीन विकास होण्याकरीता राबवीण्यात येत असलेल्या विविध योजनाची माहिती सांगून आदिवासी समाजाचा सर्वागीन विकास करण्याकरीता निधीची आवश्कता असल्यास जिल्हा नियोजन बैठकीमध्ये प्रस्ताव सादर करण्यात यावा किंवा पुरवणी मागणीमध्ये आवश्यक निधीची मागणी करावी त्या नुसार मंजुरी देण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच आश्रमशाळेतील शैक्षणीक गुणवता १०० टक्के सुधारणा होण्यासाठी योग्य नियोजन करीत येत असुन विदर्यांचे पालक यांनी सुध्दा आपले मुले नियमीत शाळेत पाठविण्यात यावेत यासोबत त्यांचे (गोंडी )बोली भाषेमध्ये पुढील वर्षापासून शिकविण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे सांगीतले.
सदर लोकार्पण सोहळा कार्यक्रमास माजी आमदार संजय पुराम, दशरथ कुळमेथे उप आयुक्त आदिवासी विकास नागपूर, पुजाताई धुर्वे सभापती, समाज कल्याण गोंदिया , संजू उईक अध्यक्ष, नगरपंचायत देवरी, अंबीकाताई बंजार सभापती,पंचायत समिती , धाबे मुख्य अभियंता सा.बा , श्री.अंजनकर, तुळशीराम सलामे, कौशल्याताई कुंभरे उपस्थित होते. यावेळी मोठया प्रमाणात आदिवासी बांधव उपस्थित होते.