देवरी येथे दमा या आजारावर मोफत औषध वितरण शिबीर संपन्न
◼️सुवर्णप्राशन फाऊंडेशन आणि दिनबंधु ग्रामीण विकास संस्थेचा स्तुत्य उपक्रम
◼️४४५ गरजू रुग्णांनी घेतला सहभाग
देवरी – गोंदिया जिल्ह्यातील स्थानिक देवरी येथील माँ धुकेश्वरी मंदिर सभागृहात सुवर्णप्राशन फाऊंडेशन,दिनबंधु ग्रामीण विकास संस्था आणि माँ धुकेश्वरी मंदिर समिती देवरी यांच्या संयुक्त विद्यमाने कोजागिरी पौर्णिमा चे औचित्य साधून दमा,जुनाट सर्दी अस्थमा अश्या प्रकारची आजार बरे होण्यासाठी मोफत आयुर्वेदिक औषध वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.मागील २ वर्षांपासून या शिबिराचे आयोजन केले असून ,या शिबिराला रुग्णांचा उत्सुर्फ प्रतिसाद मिळाला असून गोंदिया,भंडारा,गडचिरोली, नागपूर या जिल्ह्यातील जवळपास ४४५ रुग्ण सहभागी झाले असून,आयुर्वेदाचार्य सुनील समरीत यांच्याकडून त्यांची चिकित्सा करून ३३६ रुग्णांना दमा या आजाराच्या औषधी चे मोफत वितरण माँ धुकेश्वरी मंदिर समिती चे अध्यक्ष मा.ॲड.प्रशांत संगीडवार,मंदिर समितीचे सचिव सुशील शेंद्रे, सुवर्णप्राशन फाउंडेशन चे संस्थापक/अध्यक्ष मा.आयुर्वेदाचार्य सुनील समरीत,बिरसा ब्रिगेड चे संघटक मा.चेतनदादा उईके,जि.प.कर्मचारी पतसंस्थेचे संचालक विनोद चौधरी ,गोंदिया शिक्षक पतसंस्थेचे संचालक राजेश रामटेके,दिनबंधु ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष मा.कुलदिप लांजेवार,शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष मा. विनोद चौधरी,सुवर्णप्राशन चे विश्वस्त शरद समरीत यांच्या हस्ते वितरण करण्यात आले असून शरद पौर्णिमा आणि दमा या आजाराचा निकटचा संबंध असल्याने आणि दिवसेंदिवस हे आजाराची लागण वाढत असल्याने दरवर्षी कोजागिरी पोर्णिमा च्या दिनी हे शिबीर आयोजित करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.शिबिराच्या आयोजनासाठी सुवर्णप्राशन फाऊंडेशन च्या सहसचिव सौ.हितेश्री समरीत, दिनबंधु ग्रामीण विकास संस्थेचे सचिव कल्याणी लांजेवार,विश्वस्त दिपक लांजेवार,संस्थेचे स्वयंसेवक हर्षवर्धन मेश्राम,नागेश कसोंदि,गोपाल चनाप,मनोज कोडापे यांच्या सह मंदिर समिती आणि दोन्ही सामाजिक संस्थेच्या विश्वस्त आणि स्वयंसेवकांनी यांनी सहकार्य केले.