पालकमंत्री आत्राम यांच्या हस्ते पोलीस ठाणे रावणवाडी नवनिर्मित इमारतीचे उ्दघाटन


गोंदिया◼️ धर्मरावबाबा आत्राम, मंत्री अन्न औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य, तथा पालकमंत्री गोंदिया जिल्हा यांचे हस्ते पोलीस ठाणे रावणवाडी नवनिर्मित इमारतीचे उ्दघाटन, पोलीस दलास प्राप्त चारचाकी वाहनांचे लोकार्पण, आणि फिट राईज 75 डे प्रोग्राम निमित्त केंद्र शासनाच्या निर्देशानुसार देशभरातील विविध पोलीस घटकात आयोजित फिटनेस प्रोग्राम सह गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित 5 किमी फिटनेस रन (मिनी मॅरेथॉन) कार्यक्रम खा. अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री भारत सरकार,यांचे हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे हिरवा झेंडा दाखविल्यानंतर स्पर्धा कार्यक्रम संपन्न.

गोंदिया जिल्हा पोलीस ठाणे रावणवाडी चे नवनिर्मित इमारतीचे उदघाटन सोहळा, तसेच पोलीस दलास प्राप्त नवीन 31 चारचाकी वाहने यांचा लोकार्पण सोहळा, आणि सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमी हैदराबाद चे स्थापनेला 75 वर्षे पूर्ण झाल्याचे उपलक्षात केंद्र शासनाचे निर्देशानुसार देशातील विविध पोलीस घटकात पोलीस अधिकारी, अंमलदार, पोलीस कुटुंबीय व नागरिकांकरिता 5 किमी रनिंग स्पर्धेचे आयोजन करण्याचे निर्देश प्राप्त झाल्याने गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे सदर फिट राईज 75 (Fit Rise 75) डे प्रोग्राम निमित्त पो.स्टे. रावणवाडी लगतचे प्रांगणात 5 किमी रनिंग (मिनी मॅरेथॉन) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय नामदार श्री. धर्मराव बाबा आत्राम, मंत्री अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री गोंदिया जिल्हा हे लाभले होते, मा. खासदार श्री. अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री, भारत सरकार यांनी Fit Rise 75 डे निमित्त देशभरातील विविध पोलीस घटकात आयोजीत रनिंग स्पर्धेला व्हिडिओ कॉन्फरसिंग द्वारे हिरवा झेंडा दाखवून सदर उपक्रमाची सुरुवात केली. Fit Rise 75 डे प्रोग्राम हे पोलीस दलातील अधिकारी, अंमलदार, त्यांचे कुटुंबीय यांचेकरीता फिटनेस प्रोग्राम असून ते 75 दिवस पर्यंत सुरू राहणार आहे.

गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित रनिंग स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांचे उत्साह वाढविण्याकरिता धर्मरावबाबा आत्राम मंत्री अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री गोंदिया जिल्हा हे उपस्थीत असून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत मॅरेथॉन स्पर्धेस प्रारंभ करण्यात आले.

पोलीस ठाणे रावणवाडी नवनिर्मित इमारतीचे फित कापून उदघाटन करण्यात आले. तसेच पोलीस दलास प्राप्त नवीन 31 चारचाकी वाहनांचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून संपन्न झाला

उद्घाटन सोहळ्या प्रसंगी माननीय नामदार श्री. आत्राम यांचे हस्ते दीप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. तद्नंतर सोहळ्यास उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे माननीय पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे, यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले, तद्नंतर प्रमुख पाहुण्यांनी उपस्थितांना संबोधित केले. सदर उदघाटन व लोकार्पण सोहळा कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माननीय नामदार श्री.अभिजीत वंजारी, श्री विनोद अग्रवाल, श्री मनोहर चंद्रिकापुरे, श्री. परशुरामकर आदी तसेच जिल्हाधिकारी गोंदिया मा. श्री.चिन्मय गोतमारे सर, पोलीस अधीक्षक गोंदिया श्री.निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अशोक बनकर, मुख्य कार्यपालन अधिकारी श्री. पाटील, अपर पोलीस अधीक्षक आय. आर. बी . श्री. पुराम, उपविभागीय पोलीस अधिकारी,गोंदिया श्री. सुनील ताजने, पोलीस उपअधीक्षक (गृह) श्रीमती नंदिनी चांदपूरकर ,पोलीस निरीक्षक श्रीमती योगिता चापले तसेच पोलीस निरीक्षक श्री अहिरकर, श्री. लबडे, श्री. म्हेत्रे , श्री. केंजळे, श्री. सूर्यवंशी, श्री. नाळे, श्री. बनसोडे, स.पो. नी. अभिजित भुजबळ, सुनील आंबूरे, श्रीकांत हत्तीमारे, प्रियांका मेश्राम, आदी मान्यवर उपस्थित होते…. सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी रा.पो.नि. श्री. रमेश चाकाटे, आणि मुख्यालय गोंदियाची संपुर्ण टीम , पंच डॉक्टर श्री. हितेश राठोड, श्री. हसीन कावळे, तसेच झुंबा डान्स, प्रशिक्षक श्री.राहुल बघेले, मनोज बंगडकर, तसेच मोटर परिवहन विभागाचे श्री. पो.नि. आसकर, तसेच बिनतारी संदेश विभागाचे श्री. कपिल जाधव, वरीष्ठ लिपिक श्री. विनोद बोपचे आणि गोंदिया जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदार तसेच आरोग्य विभाग, अग्निशमन, यांनी अथक परिश्रम घेवुन कार्यक्रमास यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी मेहनत घेतली. सरतेशेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Share