जनता दरबारात पालकमंत्र्यांनी ऐकल्या जनतेच्या समस्या

देवरी ◼️जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी गुरुवारी स्थानिक शिवाजी संकुल येथे जनता दरबाराचे आयोजन केले होते. या वेळी तालुक्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी आपल्या समस्या पालकमंत्र्यांसमोर मांडल्या.यावेळी आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, उपविभागीय पोलिस उपविभागीय पोलिस अधिकारी अधिकारी संकेत देवळेकर, प्रभारी तहसीलदार अनिल पवार, देवरीचे पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे, चिचगडचे पोलीस निरीक्षक शरद पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपमुख्य अधिकारी विवेक महाजन, वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन धात्रक, महावितरणचे कनिष्ठ अभियंता, प्रभारी गटविकास अधिकारी के.एम.रहांगडाले यांच्यासह सर्व विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्ह्यातील आदिवासीबहुल देवरी तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते, वीज जोडणी, नेटवर्क समस्या, घरे, झोपड्या, वनपट्टे, ग्रामसभांना वनहक्क मिळणे यासह सर्व समस्या नागरिकांनी जनता दरबारात मांडल्या, ज्याचा पालकमंत्र्यांनी समाचार घेतला. गांभीर्याने घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना पाठवले.सार्वजनिक समस्यांचे तात्काळ निराकरण करण्याच्या सूचना दिल्या.

Print Friendly, PDF & Email
Share