Breaking चिचगड देवरी रोडवर भीषण अपघातात २ ठार

देवरी ◼️ चिचगड देवरी मार्गावर अब्दुलटोला नजीक ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात दोन ठार झाले असून अपघातात दगावलेल्या मृतांचे नाव रुपलाल चौधरी आणि निळकंठ मंथाले असे आहे. प्राप्त माहिती नुसार भरभाव ट्रक ने दोघांना चाकाखाली चिरडले असून ट्रक अपघात स्थळावरून पसार झाल्याचे वृत्त आहे.

देवरी शहरातून चिंचगड कडे जाणाऱ्या रस्त्यावरील अब्दुलटोला गावा जवळ ट्रक च्या धडकेत दोन लोकांचा जागीच मृत्यू झाला असून मृतकामध्ये रुपालाल चौधरी आणि नीलकंठ मंथाले यांचा समावेश असून ट्रक चालकाने दुचाकीला धडक देताच पड काढला असून देवरी पोलीस आरोपीचा शोध घेत असून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत स्व विच्छेदना करिता देवरी ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहेत तर माजी आमदार संजय पुराम यांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटना स्थळी जाऊन पाहणी करिता ट्रक चालकाला अटक करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत

Print Friendly, PDF & Email
Share