देवरी पोलिसांनी साजरा केला पोलीस स्मृतीदिन
देवरी◼️शहीद पोलीस अधिकारी/अंमलदारांच्या बाबत सर्वसामान्य जनतेमध्ये संवेदनशीता निर्माण व्हावी व त्यांच्या मनात शहीदांच्या हौतात्म्याची जाणीव आणि शहीदांचया कुटुंबियांबदल आत्मीयता निर्माण व्हावी या हेतुने सन २००३ रोजी सिंगनडोह फॉरेस्ट डेपो ची जाळपोळ केली त्या संदर्भात पोस्टे. चिचगड येथे गुन्हा दाखल करण्यात आले होता नक्षलवादयांना खात्री पटली हाती की. जाळपोळच्या ठिकाणी पोलीस पथक त्या ठिकाणी येणार आहे. त्यादरम्यान नक्षलवादयांनी सिंगनडोह पुलावर भु- भुसुरुंग पेरुन त्या ठिकाणी अंबुश पाईंट लावले. दिनांक २०/१/२००३ रोजी दुपारी पोलीस शिपाई रामागावडकर व त्यांच्यासोबत एक अधिकारी पोउपनि दिपक रहिले हे पोलीस ड्रेसवर एके ४७ घेवुन जाळपोळ केल्याचे ३कि.मी.अगोदर सिंगनडोह पुलावर नक्षलवादयांनी भु-सुरुगं स्फोट घडवुन आणला त्या घटनेत पोलीस शिपाई रामा चैतराम गावडकर व अधिकारी पोउपनि दिपक रहिले हे शहिद झाले. यानुषगाने मौजा चिचेवाडा येथे शहीद स्मारक उभारण्यात आले असुन त्या ठिकाणी २१ ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृतीदिन म्हणून पाळण्यात आले सदर कार्यक्रम दरम्यान प्रवीण डांगे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन देवरी यांचे मार्गदर्शनाखाली जि.प.प्राथमिक शाळा येथून शालेय विदयार्थी यांची रॅली काढुन गावात भ्रमण करण्यात आले व शहीद चौक चिचेवाडा येथे येवुन रामा गावडकर यांचे पुतळयाला माल्यार्पण करुन जि.प. प्राथमिक शाळा येथे सभा घेण्यात आली. सदर कार्यक्रम दरम्यान गावातील सरपंच व इतर लोक हजर होते.