ब्लॉसम स्कुलमध्ये नवरात्री व गरबा महोत्सव थाटात साजरा
◼️ विद्यार्थी आणि पालक थिरकले गरबा नृत्यावर
देवरी : तालुक्यातील लोकप्रिय ब्लॉसम पब्लिक स्कुलमध्ये नवरात्री व गरबा महोत्सव 2023 थाटात संपन्न झाला असून सदर महोत्सवाचे आयोजन प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांनी केले होते . यावेळी विद्यार्थी आणि पालकांनी मनसोक्त आनंदोत्सव साजरा केला .सदर कार्यक्रमाच्या उदघाट्नाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अंकिता रुईया, नकुल रूईया, संतोष वरपे बाल विकास प्रकल्प अधिकारी, मुकेश डुंभरे बँक निरीक्षक, डॉ. दीक्षा येडे वैद्यकीय अधिकारी, निखिल शर्मा आणि डॉ सुजित टेटे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात माताराणी च्या प्रतिमेची पूजा अर्चना करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ सुजित टेटे यांनी केले.
नर्सरी , केजी ते वर्ग दहावी पर्यंतचे विद्यार्थी गरबा नृत्य महोत्सवात सहभागी झाले असून विविध संस्कृतीचे आणि कलागुणांचे दर्शन यावेळी विद्यार्थ्यांनी दाखविले. खास करून पालकांनी या महोत्सवात आपली हजेरी लावून आनंदोत्सव साजरा केला. पालकांच्या गरबा नृत्य स्पर्धेत अनेक महिला सहभागी झालेल्या होत्या यात उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सदर गरबा स्पर्धेचे गुणदान व मूल्यमापन मुकेश डुंभरे आणि निखिल शर्मा यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली मोहुर्ले यांनी केले असून आभारप्रदर्शन सरिता थोटे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशासाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.