देवरी 🔥चहा टपरीवर चहा घेणाऱ्या दोघांना भरधाव कार नी उडवले, दोन्ही गंभीर

देवरी / लोहारा◼️ देवरी तालुक्यातील लोहारा बस स्थानक परिसरातील चहा टपरीवर चहा घेणाऱ्या दोघा इसमाना भरधाव MH40 CQ 1486 या बलेनो कार नी उडविले असून दोघाने पाय तुटल्याचे वृत्त आहे.

प्राप्त माहिती नुसार भरधाव वाहन देवरी वरून आमगावच्या दिशेने जात असतांना पुराडा मार्गाच्या दिशेने चहा टपरीती जाऊन घुसले. यामध्ये लोहारा स्थानिक दयाराम गौतम आणि बायजू नाईक यांना जबर धडक दिली असून त्यांचे पाय तुटल्याचे माहिती आहे. अपघातातील गंभीर जखमींना गोंदिया रेफर केल्याचे वृत्त आहे.

Print Friendly, PDF & Email
Share