देवरी येथे परिसर स्वच्छतेसाठी हेल्पिंग गृपचा श्रमदान अभियान

■ श्रमदान अभियानाचा दुसरा रविवार

देवरी: रविवार (ता.१५ आक्टोंबर) रोजी सकाळी सात वाजे पासून हेल्पिंग गृप व प्रभाग क्रमांक १६ देवरी च्या वतीने गोंडवाना नगर, परसटोला डेपो, अंगणवाडी परिसर देवरी येथे स्वच्छतेसाठी श्रमदान अभियान राबविण्यात आले.
या श्रमदान अभियानामध्ये नगरसेवक पंकज शहारे यांच्यासोबत शारदा मेरगुरुवार, सुनिता जांबुळकर, शालू कोसरे, संगीता खैरे, मंजुळा माऊलकर, रेवती मेश्राम, अनुसया वालदे, भाग्रता गायकवाड, गणेश मिरगुरवार, क्रिश सार्वे, आर्या भोयर, कुणाल खैरे, कृष्णा बावणे, खुशाल ठाकरे, सचिन जेठुमल, निखिल सोनवाणे, करण वालदे, सुमित वालदे तसेच प्रभाग क्र.१६ चे बहुसंख्य नागरिक यांच्यासह राज भाटिया, इलियाज कुरेशी, सुजीत अग्रवाल, सोमन चव्हाण, जय साखरे, सचिन भांडारकर आदी हेल्पिंग गृपचे सदस्य उपस्थित होते.
शेवटी या श्रमदान स्वच्छता अभियानामध्ये नागरीकांनी आपले अमूल्य वेळ दिल्याबद्दल हेल्पिंग गृपच्यावतीन सर्वांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

Print Friendly, PDF & Email
Share