सी.एस.इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी देवरी इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीची अदाणी पॉवर प्लांट तिरोडाला औद्योगिक भेट

देवरी ◼️सी.एस.इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी देवरी इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीची अदाणी पॉवर प्लांट तिरोडाला एक दिवसीय औद्योगिक भेट घेतली.त्यावेळी विद्यार्थांनी तिरोरा, गोंदिया जिल्हा, महाराष्ट्र येथे 3,300 MW (5×660 MW) कोळसा-आधारित औष्णिक वीज केंद्र. हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे कोळशावर चालणारे थर्मल पॉवर स्टेशन आहे त्यांची विद्युत उत्पादन पद्धत विद्यार्थ्यांनी बघितली. त्यासाठी राहुल सेजाव यांनी मुलांसमोर यशस्वी विद्युत निर्माण करण्याच्या प्रक्रियेचा मूलमंत्र मांडला. सदर औद्योगिक भेटीस सी.एस.इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तंत्रनिकेतन चे प्राचार्य मा. ए.एम.खतवार , इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे विभाग प्रमुख मा.एम.एम.तरोने यांचे मार्गदर्शन लाभले. कु.वी.जी.दिवाणे यांच्याकडून औद्योगिक भेटीचे आयोजन करण्यात आले होते.तरी औद्योगिक भेट यशस्वी आयोजनात प्राचार्य,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी तसेच सर्व इले्ट्रॉनिक्स विभागाच्या विद्यार्थ्यांनी आपले योगदान दिले.

Share