देवरी येथे पथसंचालन आणि दंगा काबु योजनेची रंगीत तालीम
देवरी ◼️पोलीस अधिक्षक निखील पिंगळे यांच्या संकल्पनेतुन अपर पोलीस अधिक्षक अशोक बनकर, संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांच्या मार्गदर्शना खाली आगामी काळात साजरे करण्यात येणारे सण उत्सव शांतेतत व निर्वीघ्नपणे पार पाडण्यासाठी तसेच सण उत्सव काळात जिल्हयात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी दिनांक १४/१०/२०२३ रोजी ०९.३० वा. ते १०.३० वा. पर्यंत आगामी धम्मचक्र परिवर्तन दिन.दसरा.विजया दशहमी नवरात्रौ २०२३ चे अनुषंगाने देवरी येथे गावातील मुख्य मार्गाने व मुख्य चौकातुन चिचगड रोड, राणी दुर्गावती चौक , बाजार लाईन , दुर्गा चौक, मस्जिद. कारगील चौक. पंचशिल चौक. सुरभी चौक येथुन पथसंचालन करुन पोलीस स्टेशन देवरी येथे दंगा काबु योजना रंगीत तालीम घेण्यात आली. सदर पथसंचालन मध्ये पोलीस स्टेशनचे पोनि प्रविण डांगे , सपोनि जाधव, ३३ पोलीस अंमलदार सी-६० पथक , २ अधिकारी ,२७ अंमलदार हजर होते.