धुकेश्वरी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

देवरी येथील सुप्रसिध्द मॉ धुकेश्वरी सार्वजनिक मंदिरात दरवर्षी प्रमाणे यावर्षी पण १५ ते २३ ऑक्टोबर पर्यंतच्या शारदीय नवरात्र उत्सव निमीत्त संपूर्ण नऊ दिवस विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यात १५ ऑक्टोबरला सकाळी स्वच्छता अभियान व सायंकाळी ०६ वाजता घटस्थापना, १६ ऑक्टोबरला रात्री ०७ : ३० वाजता १३ वर्ष वयोगट पर्यंतच्या सर्वांसाठी धार्मिक नृत्य स्पर्धा, १७ ऑक्टोबरला रात्री ०७ : ३० वाजता रास गरबा शो, १८ ऑक्टोबरला १३ वर्षांवरील सर्वांसाठी धार्मिक नृत्य स्पर्धा, १९ ऑक्टोबरला सकाळी पंचमी अभिषेक व रात्री ०७ : ३० वाजता धार्मिक कार्यक्रम, २० ऑक्टोबरला रात्री ०७ : ३० वाजता खुली दांडिया स्पर्धा, २१ ऑक्टोबरला रात्री ०७ : ३० वाजता भव्य संगीत भजन स्पर्धा, २२ ऑक्टोबरला दुपारी ०३ वाजता अष्टमी हवन, सायंकाळी ०६ वाजता थाली तथा हार स्पर्धा व रात्री ०७ : ३० वाजता सुर मोहिनी छत्तीसगढी धार्मिक नृत्य आणि २३ ऑक्टोबरला सायंकाळी ०६ वाजेपासून साडी वितरण, ज्योत विसर्जन व महाप्रसाद वितरण करण्यात येईल.
या व्यतिरिक्त पुन्हा चलित चित्रण असलेल्या विविध देखाव्यासह आकर्षक झाकी, जादू प्रयोग, भव्य मिनीबाजार आणि आकर्षक इलेक्ट्रीक झुले असे विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले आहेत.
तरी वरील आयोजीत सर्व कार्यक्रमाचा आनंद जास्तीत जास्त भक्त गणांनी घेण्यात आवाहन धुकेश्वरी सार्वजनिक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. प्रशांत संगीडवार, उपाध्यक्ष कुवरलाल भेलावे, सचिव सुशील शेंद्रे आणि उत्सव समितीतील सर्व सदस्यांनी केले आहे.

Share