“वृक्षारोपण व संवर्धन ही आपली नैतीक जबाबदारी”

Gothangaon◼️निखील पिंगळे सा. पोलीस अधिक्षक गोंदिया, मा. श्री. अशोक बनकर सा., अपर पोलीस अधिक्षक गोंदिया कँप देवरी, मा. श्री. संकेत देवळेकर सा., उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग देवरी यांचे मार्गदर्शनाखाली कम्युनिटी पोलीसिंग अंतर्गत दादालोरा एक खिडकीच्या माध्यमातुन सशस्त्रं दुरक्षेत्र गोठणगांव कार्यक्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.

पर्यावरणाची गुणवत्ता वाढविणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरुकता निर्माण करण्याच्या अनुषंगाने आज दि. ०८/१०/२०२३ रोजी सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगांवच्या वतीने गोठणगांव परीसरातील विविध भागात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आंबा व अशोक याप्रकारच्या १० झाडांची रोपे लावण्यात आली.

“वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” या संत वचनाप्रमाणे वृक्षांचे महत्व आपल्या जीवनात अनन्यसाधारण आहे. निसर्ग आपले आरोग्य जपतो. मग साहजिकच निसर्गाची जपणुक ही आपली जबाबदारी आहे, असा संदेश वृक्षारोपनाच्या या सामाजिक कार्यक्रमातुन देण्यात आला.

सदर वृक्षारोपण कार्यक्रमाला गोठणगांव ग्रा.पं.चे सरपंच श्री. संजयजी ईश्वार, उपसरपंच श्री. कांतीलालजी डोंगरवार, सदस्य श्री. दिपकजी राणे व गावातील प्रतिष्ठीत नागरीक तसेच सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगांव चे प्रभारी अधिकारी सपोनि. श्री. सचिन घाटे सा., पोउपनि शुभम नवले सा, तसेच जि.पो. चे स.फौ.राजकुमार घोरमारे, पोहवा. देवेंद्र थेर, पोना. कमलेश राऊत, किशोर नखाते, अरविंद वालदे, पोशि प्रकाश गभणे, नोहरलाल लिल्हारे, नागेश देवकर व आयआरबी चे अंमलदार उपस्थित होते.

Share