देवरी बाजारातून मोबाईल चोरून फोन पे वरून ७८ हजार उडवले..!

देवरी ◼️ तालुक्यातील आठवडी बाजारातून मोबाईल चोरीच्या घटना नवीन नसून यावेळी चोराने चक्क चोरी केलेल्या मोबाईल मधून फोन पे ऍप मधून ७८ हजार उडविल्याचे प्रकरण समोर आले आहे.

सविस्तर वृत्त असे की दि. ०३/१०/२०२३ च्या १७.०० वा ते दिनांक ४/१०/२०२३ चे १२.०० वा. दरम्यान यातील फिर्यादी यशवंत शामराव पुराम वय ५४ वर्ष रा. देवरी ता. देवरी जि.गोदिया हा देवरी येथे आठवाडी बाजार करित असताना यातील अज्ञात इसमाने फिर्यादीच्या शर्टच्या खिश्यामधुन रिअलमी कंपनीचा मोबाईल चोरुन नेवुन फिर्यादीच्या मोबाईल मध्ये ईनस्टॉल असलेला फोन पे चा लॉक उघडुन फोन पे द्वारे वेगवेगळया यु.पी.आय.डी वर ७८,१९० / / – रुपये ट्रान्सफर केले असल्याने फिर्यादीच्या अंकाउट मधुन ७८,१९० / – रुपये व ८००० /- रुपये किंमतीचा मोबाईल असा एकुन ८६,१९०/- रुपये चा माल चोरुन नेल्याने फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरुन पोस्टे देवरी येथे अप क्र. ३५२ / ०२३ कलम ३७९ भादवि सहकलम ६६ माहिती तंत्रज्ञान अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास पोनि प्रविण डांगे पो.स्टे देवरी हे करीत आहेत.

Share