गळफास घेतलेल्या अवस्थेत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

देवरी◼️ तालुक्यातील शिरपूर शिवारात राज रेस्टॉरंटच्या मागील जंगल परिसरात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह नग्न अवस्थेत झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. ही घटना मंगळवारी (दि.१०) दुपारच्या सुमारास उघडकीस आली.

प्राप्त माहितीनुसार राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या राज रेस्टॉरंटच्या मागे जंगल परिसरात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. दरम्यान नागरिकांनी याची माहिती पोलिस पाटलाला दिली.

पोलिस पाटलाच्या सूचनेवरून देवरी पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहिले असता अनोळखी व्यक्तीचा मृतदेह हा नग्न अवस्थेत झाडाला फासावर लटकून होता. घटनास्थळी एक बॅग व त्याचे कपडे आढळले. हा ट्रक चालक असू शकतो, असेही पोलिसांनी सांगितले. ज्याप्रमाणे मृतकाचे शरीर जीर्ण झाले आहे त्यावरून ही घटना आठ ते दहा दिवसांपूर्वीची असावी, असा अंदाज लावला जात आहे. फिर्यादिचे तोंडी रिपोर्टवरून पोस्टे देवरी येथे अकस्मात मृत्यु क. ३३ / २०२३ कलम १७४ जाफौ अन्वये मर्ग नोंद करण्यात आला असुन सदर मर्गची चौकशी देवरी पोलिसांनी मर्ग दाखल केला असून तपास पोलिस निरीक्षक प्रवीण डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा / ९५१ कोडापे पोस्टे देवरी, हे करीत आहेत.

Print Friendly, PDF & Email
Share