‘कटार काळजात घुसली’ नाटकाला रसिकांची उत्स्फूर्त प्रतिसाद

गोंदिया ◼️ मनोहरभाई पटेल अकादमीच्य वतीने आयोजित ‘कटार काळजात घुसली’ संगीत नाटकाला शहरातील रसिकांची उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागपूर येथील भानुदास कुळकर्णी यांच्या दिग्दर्शनाखाली या नाटकाचे आयोजन नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते. मराठी रंगभूमीवर अधिराज्य गजविणार्‍या दैदिप्यमान, अभिजात आणि अजरामर संगीत नाटकाच्या प्रयोग नागपूरच्या नामवंत कलावंतांनी सादर केला.

विशेष म्हणजे, शहरात प्रथमच झालेला हे संगीत नाटक नाट्य रसिकांसाठी अद्भूत व अविस्मरणीय ठरला. नाटकाला माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार विनोद अग्रवाल, आमदार राजूभाऊ कारेमोरे, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, गंगाधर परशुरामकर, नरेश माहेश्‍वरी, भानुदास कुलकर्णी, डॉ. शिला कुलकर्णी, निखिल जैन, यशवंत गणवीर आदी मान्यवरांसह हजारोच्या संख्येने नाट्यरसिक उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share