देवरी उत्तर – दक्षिण वन परिक्षेत्र विभागातर्फे वन्यजीव सप्ताहाचे आयोजन

■ १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव वर आधारीत विविध कार्यक्रमाचे आयोजन

देवरी: वन्यजीव संवर्धनासाठी सर्वसामान्य नागरिकांमध्ये जागृती करण्याच्या उद्देशाने देवरी उत्तर व दक्षिण वन परिक्षेत्र विभागाने १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताहाचे आयोजन केले आहे. आज उत्तर – दक्षिण वन परिक्षेत्रात मोटार सायकल रॅली काढत उद्या २ ऑक्टोबंर स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.तसेच वन्यजीवावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
उत्तर – दक्षिण वन परिसरामध्ये आढळणारे वन्यप्राणी, पक्षींचे आकर्षक छायाचित्रे आणि त्यांची रंजक माहिती या प्रदर्शनामध्ये बघायला मिळणार आहे. यानिमित्त निसर्ग केंद्रांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात येणार आहेत, अशी माहिती उत्तर – दक्षिण वन परिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन धात्रक व चिडे यांनी दिली आहे.

दरम्यान,वनविभागाच्या वतीने या सप्ताहामध्ये दररोज विविध स्पर्धा, वन्यजीव विषयी व्याख्यानमाला, चित्रकला, रांगोळी, टाकाऊतून टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शन, पथनाट्य, पपेट शो असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या क्षेत्रात कार्यरत असलेल्या अभ्यासकांचे व्याख्यानही दररोज होणार आहे. उद्या २ ऑक्टोबरला स्वच्छता अभियान चित्रकला आणि ३ ऑक्टोबरला वन्यजीव संवर्धन या विषयावर त्या त्या वनपरिक्षेत्रात मार्गदर्षशन घेण्यात येणार आहे, अशी माहिती देवरी उत्तर व दक्षिण वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन धात्रक व चिडे यांनी दिली आहे.

Share