भाजपच्या मेरी माटी मेरा देश अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

देवरी◼️ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार संजय पुराम यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानातंर्गत काढलेल्या अमृत कलश यात्रेला देवरी-आमगाव विधानसभा क्षेत्रात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सांगता सोहळ्यानिमित्त आयोजित माझी माती माझा देश हे उपक्रम 20 सप्टेंबरपासून राबविण्यात येत आहे. आमगाव तालुक्यात या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर देवरी तालुक्यातील हरदोली येथील दत्त मंदिरात पूजा अर्चना केल्यावर 25 रोजी यात्रेचा शुभारंभ संघटनमंत्री वीरेंद्र अंजनकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यात्रेचा समारोप 29 सप्टेंबर रोजी वडेगाव येथे करण्यात आला. देवरी तालुक्यातील 100 गावातून ही कलश यात्रा काढण्यात आली. यात्रेत गावागावातील पुरुष, महिला तसेच शाळकरी मुलांनी भारत मातेच्या गौरव करीत अमृत कलशमध्ये आपल्या घरासमोरील माती कलशमध्ये टाकून वीरांना वंदन केले. या अभियानात भाजपचे पदाधिकारी वीरेंद्र अंजनकर, प्रमोद संगीडवार, झामसिंग येरणे, सविता पुराम, कल्पना वालोदे, नितेश वालोदे, श्रीकृष्ण हुकरे, भाऊराव येरणे, कमल येरणे, हनुवंत वट्टी, शंकर मडावी, अंबिका बंजार, अनिल बिसेन, प्रवीण दहीकर, अनिल येरणे, शालिक गुरनुले, ममता अंबादे, श्यामकला गावळ, वैशाली पंधरे, दीपक अग्रवाल, बबलू डोये, यादव पंचमवार, विजय कश्यप, सुखचंद राऊत, धनराज कोरोंडे, गणेश भेलावे, बंटी भाटिया, इंदरजीतसिंह भाटीया, राजू शाहू, संजू उईके, प्रज्ञा संगिडवार, नूतन सयाम, संजू दरवळे, आफताब शेख, रितेश अग्रवाल,कौसल्या कुंभरे, देवकी मरई, पिंकी कटकवार, विनोद भेंडारकर, विजय गहाणे, यदू बकचुरिया, नेतराम हिडामी तसेच भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.

Share