“कम्युनिटी पोलिसिंग” च्या माध्यमातून AOP बोंडे येथे गणेशोत्सव साजरा

देवरी ◼️ पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक बनकर कॅम्प देवरी, उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर यांचे संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली, कम्युनिटी पोलिसिंग च्या माध्यमातून तसेच
सपोनि.शरद पाटील, पोलिस स्टेशन चिचगड यांचे नेतृ्त्वाखाली AOP बोंडे चे प्रभारी अधिकारी आम्ही PSI प्रेमकुमार शेळके व अंमलदार सह आज दिनांक 25/09/2023 रोजी * गणेश उत्सवाचे औचित्त साधून AOP बोन्डे येथे दादालोरा खिडकी योजना एक हात मदतीचा या योजने अंतर्गत नक्षल ग्रस्त अतिसवेदनशील क्षेत्रातील आदीवासी जनता व AOP हद्दीतील शाळेतील विद्यार्थी यांना एक विरंगुळा निर्माण व्हावा म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम नृत्य, संगीत असे विविध कार्यक्रम घेऊन प्रथम, द्वितीय, तृतीय असे क्रमांक देऊन बक्षीस देण्याची तजवीज ठेवली आहे. सदर कार्यक्रमाला ग्राम बोंडे, पळसगाव येथील शाळकरी विद्यार्थी आणि हजर होते. नागरिकानी व शाळकरी मुलांनी गोंदिया जिल्हा पोलीस दल यांचे आभार वक्त केले.
सदरचा उपक्रम हा शांततेत पार पडला. सदर उपक्रमाच्या यशासाठी कम्युनिटी पोलिसिंग, AOP बोन्डे, पो.स्टे. चिचगड यांनी प्रयत्न केले.

Share