सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगांव तर्फे वृक्षारोपन कार्यक्रम संपन्न

Gothangaon◼️ सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगांव यांचे वतीने दादालोरा एक खिडकी योजनेअंतर्गत विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. या अंतर्गत दि.११/०९/२०२३ रोजी मौजा बोंडगांव येथील विर भगवान बिरसा मुंडा यांचे पुतळयाचे पुजन करुन सभोवतालच्या परीसरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच विर भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळयाच्या सभोवतालच्या परीसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.

सदर वृक्षारोपण कार्यक्रम केशोरीचे ठाणेदार सपोनि. सोमनाथ कदम सा. यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडण्यात आला. सपोनि. कदम यांनी मार्गदर्शन करतांना आपल्या सर्वांसाठी वृक्ष हे एक नैसर्गिक वरदान आहे असे सांगुन वृक्षारोपणाचे महत्व पटवुन दिले.

सदर उपक्रम निखील पिंगळे पोलीस अधिक्षक गोंदिया, अशोक बनकर सा., अपर पोलीस अधिक्षक गोंदिया कँप देवरी, संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग देवरी यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला

सदरवेळी सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगांव चे प्रभारी अधिकारी सपोनि. सचिन घाटे सा. यांनी प्रास्ताविक केले तर पोउपनि शुभम नवले साधांनी आभार मानले. सदर कार्यक्रमाकरीता केशोरी पोलीस स्टेशनचे पोउपनि प्रताप बाजड सा., सशस्त्र दुरक्षेत्र गोठणगांवचे पोहवा. राजेश पुराम, गणेश मिसार, शामराव मडावी पोशि. प्रकाश गभणे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Share