आम्हाला फक्त शिकवू दया, शिक्षक समन्वय समितीचे तहसीलदारांना निवेदन


देवरी ◼️ शिक्षक समन्वय समिती तालुका देवरी मार्फत तहसीलदार देवरी व गटशिक्षणाधिकारी देवरी यांना नवभारत साक्षर कार्यक्रमावर बहिष्कार करीत असल्याबाबत निवेदन देण्यात आले आहे.

सदर निवेदनामार्फत २०२३-२४ सत्र सुरु झाल्यापासून अनेक प्रकारचे उपक्रम पत्रे परीक्षा सर्वे यांचा भडिमार शासन स्तरावरून होत आहे. नवभारत साक्षर कार्यक्रम अंतर्गत soft copy, hard copy मध्ये सादर करणे, तसेच प्रत्यक्ष वर्ग सुरू करणे ,फोटो पाठविणे, Ulhas App download करणे व त्याचा वापर करणे इत्यादी बाबी करण्याची जबाबदारी प्रशासनाने शाळा स्तरावर निश्चित केली असल्यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकविण्यास वेळ मिळत नाही. या शासनाच्या शैक्षणिक माहितीमुळे बराचसा वेळ जात असल्यामुळे विद्यार्थ्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे पालकांचे शिक्षकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी नवभारत साक्षर कार्यक्रम अंतर्गत सर्व कामावर शिक्षक समन्वय समिती देवरी मार्फत बहिष्कार करीत असल्याचे निवेदन तहसीलदार तहसीलदार देवरी व महेंद्र मोटघरे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती देवरी यांना देण्यात आले आहे. तसेच आम्हाला फक्त शिकवू द्या अशी मागणी केली.

यामधे शिक्षक समिती,शिक्षक संघ,जुनी पेन्शन संघटना,शिक्षक सहकार संघटना, कास्ट्राईब शिक्षक संघटना, विदर्भ मागासवर्गीय संघटना, शिक्षक भारती संघटना पुरोगामी शिक्षक संघटना तथा सर्व शिक्षक समन्वय समितीचे सदस्य व शिक्षक गण उपस्थित होते.

Share