देवरी येथे भाजप बुथ योद्धांची बैठक उत्साहात

देवरी ◼️ आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसंदर्भात नियुक्त केलेल्या भाजप बुथ योध्दांची बैठक 8 सप्टेंबर रोजी देवरी येथील छत्रपती शिवाजी संकुलात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी भंडारा-गोंदिया जिल्हा भाजपा समन्वयक विरेंद्र अंजनकर उपस्थित होते. त्यावेळी विरेंद्र अंजनकर म्हणाले, भाजप हा विश्‍व आणि राष्ट्रीय स्तरावरील सर्वात मोठा पक्ष असून आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी देशातील सर्व विरोधी पक्षांनी महागठबंधन तयार केलेले आहे.

भाजपला जिंकवायचं असेल तर बुथ योद्धांनी घरोघरी जाऊन जनतेला राज्य व केंद्र शासनाद्वारे राबविले जाणार्‍या विविध जनहितकारी योजनांची द्यावी. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये होणार्‍या प्रत्येक देशहित, जनहितकारी कार्यक्रमांची, राजकीय घडामोडींची माहिती व्हावी याकरिता प्रत्येक व्यक्तीच्या मोबाईलवर सरल अ‍ॅप डाउनलोड करून देणे, जास्तीत जास्त नवीन मतदार नोंदणी करून देण्याचे निर्देश यावेळी त्यांनी बुथ योद्धांना दिले. बैठकीला माजी आमदार संजय पुराम, जिप सभापती सविता पुराम, महामंत्री विनोद भांडारकर, बंटी भाटिया, जिल्हा सचिव यादव पंचमवार, पंस सभापती अंबिका बंजार सभापती, नगराध्यक्ष संजू उईके, उपाध्यक्ष प्रज्ञा सांगिडवार, नगरसेविका कौशल्या कुंभरे, सीता रंगारी, नगरसेवक अन्नू शेख, संजय दरवडे, युवा मोर्चाचे अध्यक्ष छोटू भाटिया तसेच नवनियुक्त बुथ योद्धे व भाजप पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित होते. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष अनिलकुमार येरणे यांनी मांडले. संचालन महामंत्री प्रविण दहीकर महामंत्री यांनी केले.

Share