मयुर मस्के यांची एन एस डी कार्यशाळेकरिता निवड
देवरी :अभिनयासह नाट्य क्षेत्रातील पूरक बाबींचे सूक्ष्म मार्गदर्शन करणाऱ्या राष्ट्रीय नाट्य विद्यालय (एनएसडी) द्वारा आयोजित “नाट्य प्रशिक्षण कार्यशाळा” गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे ५ आगष्ट पासुन एक महिण्याकरिता पार पडणार आहे. त्यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील एकमेव विद्यार्थी मयुर सुधाकर मस्के यांची निवड झाली आहे.
या कार्यशाळेत प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये तीव्र स्पर्धा असुन नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या एक महिणा कालावधीच्या नाट्य प्रशिक्षण कार्यशाळेत नाट्यशास्त्रातील व्यावसायिक शिक्षण, नेपथ्य, दिग्दर्शन आणि अभिनय, नाट्यक्षेत्राशी निगडित मार्गदर्शन विद्यार्थ्यांना कार्यशाळेत मिळणार आहे.
त्यांच्या या यशाबद्दल आई-वडील, मित्रपरिवार व एम.बी पटेल महाविद्यालय देवरी येथिल प्राचार्य अरुण झिंगरे व प्रा.डा.वर्षा गंगणे व संगितकार गौतम गुरूजी यांनी अभिनंदन केले आहे