10 हजाराची लाच घेतांना पशुधनविस्तार अधिकारीसह एक इसम ताब्यात

गोंदिया 04- गोंदिया पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या पशुधन विभागातील पशुधन विस्तार अधिकारी व एका खासगी इसमास लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुरुवारच्या रात्रीला गोरेलाल चौकातून ताब्यात घेण्यात आले.त्यांचे नाव आरोपी लोकसेवक जयंतप्रकाश ईश्वरदास करवडे वय ३९ वर्ष पद- पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती गोंदिया जिल्हा गोंदिया रा. तिरोडा जि. गोंदिया. व खाजगी ईसम महेंद्र हगरू घरडे वय ५० वर्ष धंदा खाजगी नोकरी रा. मु. पो. चुटीया.ता.गोंदिया यांचा समावेश आहे.दि. 03/08/2023 रोजी 10000/- रुपये लाचेची रक्कम आरोपी क्रं 2 याने स्वीकारले.तक्रारदार यांनी नाविन्यपुर्ण योजना अंतर्गत १००० मांसल कुक्कुट पक्षीगट योजने अंतर्गत कुक्कुटपालना करीता शेड ची उभारणी करून कोंबड्यांची पिल्ले खरेदी करून व्यवसाय सुरू केला आहे. सदर योजने अंतर्गत शासनाकडून मिळणारा अनुदानाचा पहीला हप्ता रक्कम रु ६८५००/- तक्रार दारास मिळाला असून अनुदानाच्या दुसऱ्या हप्त्याचे रू १,००,०००/- रकमेचा धनादेश काढून देण्याचे प्रकरण मार्गी लावण्याकरीता आलोसे क्रमांक १ यांनी तक्रारदाराकडे
१२,०००/- रू लाचेची मागणी करून तडजोडी अंती रू ११,०००/- रू लाच मागणी करून १०,०००/- रु लाच स्विकारण्याची तयारी दाखवुन व उर्वरित १०००/- रू लाच धनादेश मिळाल्यानंतर देण्याची मागणी करुन आज रोजी लाचेची रक्कम रू १०,०००/- ही आरोपी क्रमांक २ याच्या मार्फत स्विकारली असुन लाचेच्या रकमेसह आरोपी क्रं २ व तदनंतर आरोपी क्रं १ यांना ताब्यात घेण्यास आले आहे.पो. स्टे. गोंदिया शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

मार्गदर्शन :राहुल माकणीकर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर परिक्षेत्र, नागपूर, * संजय पुरंदरे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर परिक्षेत्र, नागपूर सचीन कदम, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर परिक्षेत्र, नागपूर
अनामिका मिर्झापूरे, वाचक पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि नागपूर परिक्षेत्र,नागपुर.पर्यवेक्षक अधिकारी विलास काळे पोलीस उप अधीक्षक ला. प्र. वि. गोंदिया,सापळा कार्यवाही पथक पो. नि. उमाकांत उगले, पो. नि. अतुल तवाडे , स. फौ. विजय खोब्रागडे, पो. हवा. संजयकुमार बाहेर,पो.हवा.मंगेश काहालकर, नापोशि. संतोष शेंडे, नापोशि संतोष बोपचे,नापोशि प्रशांत सोनवाने, मनापोशी संगीता पटले ,चालक नापोशि दिपक बाटबर्वे आदींनी कारवाई केली.

Share