एकल ग्रामोत्थान फाऊंडेशनतर्फे प्रमाणपत्र वितरण

देवरी राष्ट्रीय ग्रामोत्थान फाऊंडेशन ही एक सामाजिक संघटना असून या सामाजिक स्वयंसेवी संघटनेद्वारे भारतातील ग्रामीण भागात एकल अभियान सुरु आहे.
या अभियानात अनेक ग्रामीण ठिकाणी एकल विद्यालय आणि शिलाई मशीन केंद्र सुरु असून यात जातपातीचा विचार न करता आर्थिक दूर्बल विद्यार्थ्यांना एकल विद्यालयाच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून मोफत शिकवले जातंय. तर, आर्थिक दूर्बल असलेल्या महिलांना सक्षम करण्यासाठी मागील सात महिन्यांपासून मोजक्यास्वरुपात फक्त प्रवेश शुल्क घेऊन तीन – तीन महिन्याच्या तुकडीने शिलाई मशीनचे प्रशिक्षण दिले जात आहे.
या शिलाई मशीन प्रशिक्षणातील केंद्रात आजपर्यंत ज्या महिलांनी प्रशिक्षण घेतले आहे. अशा ४३ महिला भगिनींना ३० जुलै रविवारला देवरी येथील मस्कऱ्या चौकातील प्रशिक्षण केंद्रात प्रमाणपत्र एकल अभियान समिती गोंदिया जिल्हा मुख्यसंरक्षक अनिल जोशी यांच्या अध्यक्षतेखाली वितरण करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. सुनिल आकांत, उपाध्यक्ष सविता पुराम, सुनिल अग्रवाल, भाजपचे जिल्हा सचिव यादवराव पंचमवार, नगराध्यक्ष संजू उईके, नगरसेविका सीता रंगारी, बोरगांव संच अध्यक्ष पवन अग्रवाल, उपाध्यक्ष नितेश वालोदे, बाळकृष्ण गायधने, सचिव सुरेश चन्ने, वडेगाव संच अध्यक्ष अंजू बिसेन, देवरी महिला समिती अध्यक्षा शिल्पा बांते, देखरेख समिती अध्यक्षा कल्पना अग्रवाल, सचिव रुपाली शाहू , अभियान प्रमुख शिवकुमार बल्हारे, बालशिक्षा प्रमुख निलकंठ पुराम, ग्राम स्वराज्य प्रमुख प्रवीण गिरी, संच प्रमुख रोशन कोटागंले, रेखा कोल्हारे आणि प्रशिक्षक प्रिती उईके आदिंची प्रमुख उपस्थिती होती.

Print Friendly, PDF & Email
Share