सडक अर्जुनी तालुक्यात कोतवाल भरती परीक्षेत गैरप्रकार

सडक अर्जुनी ⬛️तालुक्यात कोतवाल पदासाठी 30 जुलै रोजी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत घोळ झाल्याचा आरोप करुन, याप्रकरणी चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात यावी. तसेच परीक्षा रद्द करुन नव्याने घेण्यात यावी, अशी मागणी परीक्षार्थ्यांनी तहसीलदारांना निवेदनातून केली आहे.

निवेदनानुसार, कोतवालाच्या चार जागांसाठी 83 परीक्षार्थींनी परीक्षा दिली. ही परीक्षा 11.30 वाजता सुरु होणार होती. मात्र 12 वाजता सुरु करण्यात आली. परीक्षा सुरु असताना काही परीक्षार्थीना कॉपी पुरविण्यात आल्याचा प्रकार समोर आल्याने या परीक्षेत घोळ झाल्याचा आरोप अन्य परीक्षार्थींचा आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रावर झालेल्या गैरप्रकाराची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी. तसेच परीक्षा रद्द करावी व पुन्हा परीक्षा घेण्यात यावी, अशी मागणी माजी सरपंच केवळराम खोटेले, राजेश कोरे, किशोर उईके, शेखर मरसकोल्हे, युग झिंगरे, विशाल मंडारी, नाशिक सलामे, प्रदीप मळावी सागर टेकाम, महेंद्र राऊत, लोकेश कुरसुंगी तसेच परीक्षार्थींनी तहसीलदार निलेश काळे यांना निवेदनातून केली आहे.

Share