????कॅनेरा बँकचे ATM मशीन तोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला २४ तासात अटक

देवरी ◼️ येथील कॅनेरा बँक चे ए.टि. एम. मशीन मध्ये एक अनोळखी इसम जावुन त्याचे जवळील असलेल्या साधणाने ए. टि. एम. मशीनची छेडछाड केली व ए.टि. एम. मशीनचे पैसे काढण्याची जागेची छेडछाड करुन चोरी करण्याचा प्रयत्न केला असल्याने फिर्यादीचे रिपोर्ट वरुन गुन्हा दाखल करण्यात आले. गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे गोंदिया , अशोक बनकर अपर पोलीस अधीक्षक गोंदिया कॅम्प देवरी, यांच्या मार्गदर्शनात व सुचणेप्रमाणे प्रविण डांगे पोलीस निरीक्षक यांनी अनोळखी इसमांच्या शोधासाठी पो. हवा. परसमोडे / ११३६, पोना कांदे/१८१३, पोशि चव्हाण/४१९, पोशि डोहळे/९९८ यांचे पथक रवाना केले.

२४ तासात सदर गुन्हयातील आरोपी नामे पुरेन्द्र ऊर्फ अनिल ऊर्फ बच्चा कमलेश शुक्ला वय २३ वर्षे रा. मातोश्री नगर हिंगणा रोड, वानाडोगरी, नागपुर याचा शोध घेवुन गुन्हयात अटक केले.

गुन्हयाचा पुढील तपास मा.श्री. प्रविण डांगे पोलीस निरीक्षक साहेब यांचे मार्गदर्शनाखाली सपोनी मुकंद जाधव पोस्टे देवरी हे करीत आहेत.

Share

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

और पढ़ें