एड. आशा भाजीपाले यांची सहायक सरकारी अभियोक्ता पदावर निवड, राज्यातून 46 व्या स्थानी

◼️एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत सहाय्यक सरकारी अभियोक्ता गट अ पदी निवड

देवरी ◼️ आदिवासी आणि नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळख असलेल्या देवरी तालुक्यातील छोट्या सालई या खेडेगावातील एड आशा तेजराम भाजीपाले यांची नुकतीच एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत सहाय्यक सरकारी अभियोक्ता गट अ पदी निवड झाली आहे. त्यांनी ओबीसी संवर्गातून राज्यातून ७ व्या स्थानी येण्याचा मान देखील मिळविला आहे. महाराष्ट्रातून मेरिट लिस्ट ४६ व्या स्थान मिळविला आहे.

प्राथमिक शिक्षण , पदवी शिक्षण , देवरी येथे झाला असून एलएलबी एनएमडी कॉलेज गोंदिया येथे झालेला आहे. सदर परीक्षेचा सराव १ वर्षापासून सुरू होता त्यामधे त्यांनी राज्यात ओबीसी गटात ७ वा स्थान प्राप्त करुन देवरी चे नाव लौकिक केले आहे.

एड आशा भाजीपाले यांनी सदर यशाचा श्रेय आईवडील, पती प्रविण दळवी, मार्गदर्शक एड. प्रशांत संगीडवार मित्र परिवार आणि कुटुंबीयांना दिले आहे. यांचे तालुक्यासह गोंदिया जिल्हात अभिनंदन करण्यात येत आहे.

Share