विद्यार्थ्यांनो रस्ता ओलांडताना घाबरू नका देवरी पोलीस आपल्या पाठीशी आहे!

◼️महामार्गावर विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडण्यास वाहतूक पोलिसांचे सहकार्य

देवरी ◼️ महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेल्या देवरी शहरातून महामार्ग 6 (मुंबई ते कोलकाता) गेलेला असून RTO चेक पोस्ट असल्याने मोठ्या प्रमाणात जळवाहनांची वरदळ असते. राष्ट्रिय महामार्गावर देवरीशहर वसलेले असून मुख्य बाजारपेठ , शाळा , महाविद्यालये आणि शिक्षणासाठी ग्रामीण भागातून मोठ्याप्रमाणात विद्यार्थी , मजूर , कामगार आणि सर्वसामान्य नागरिक शहरात हजेरी लावत आहेत. शहराच्या मधोमध गेलेल्या महामार्गवर उभे असलेल्या अनाधिकृत पार्क केलेल्या ट्रक व जळवाहनांमुळे महामार्गावरून येणारे जाणारे वाहन दिसत नसल्यामुळे जिव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे.

यावर उपाय म्हणून देवरीचे वाहतूक पोलीस हवालदार निलेश जाधव (१५८३ ) यांनी शालेय विद्यार्थ्यांनी सुरक्षा लक्षात घेता महामार्गावरून सुरक्षित रस्ता ओलांडताना सहकार्य करीत आपले कर्त्यव्य बजावले आहे. निश्चितच यामुळे विद्यार्थी सुरक्षितरित्या शाळेत पोहचतील आणि पालकांची चिंता दूर होण्यास मदत मिळेल.

यावेळी विद्यार्थ्यांनी शालेय वेळेत महामार्ग ओलांडताना वाहतूक पोलिसांची मदत घेण्याचे आवाहन करण्यात आले.

Share