श्रावण महोत्सवात ब्लॉसमच्या चिमुकल्यांनी दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश

◼️ब्लॉसम पब्लिक स्कूल येथे श्रावण ऋतूच्या पार्श्वभूमीवर स्तुत्य उपक्रम

देवरी ◼️तालुक्यातील अग्रगण्य ब्लॉसम पब्लिक स्कूल येथे श्रावण महोत्सवाला सुरुवात झाली असून शाळेतील केजीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धन विषयावर वेशभूषा करुन सर्वांचे मने जिंकली.

विशेष म्हणजे प्राचार्य डॉ. सुजित टेटे यांच्या संकल्पनेतून श्रावण महोत्सवाला सुरुवात झाली असून चिमुकल्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवा आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने सदर उपक्रम राबविण्यात येत आहे.

यामध्ये विद्यार्थ्यांनी येरे येरे पावसा… सरी वर सरी… आदि कविता गायन करीन आनंदोत्सव साजरा केला. सदर कार्यक्रमाच्या यशासाठी पूर्वप्राथमिक चे मनीषा काशीवार, कलावती ठाकरे, प्रियांका आंबिलकर पौर्णिमा बिसेन यांनी सहकार्य केला.

Share