हेल्मेट वापराबाबत देवरी पोलिसांकडून जनजागृती, आठवडी बाजारात पटवून दिले हेल्मेटचे महत्त्व

प्रहार टाईम्स ◾️रस्ते अपघातांमध्ये हेल्मेट नसणाऱ्यांचे मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे हेल्मेट वापराबाबत देवरी पोलीस ठाणे अंतर्गत वाहतूक पोलिसांनी जनजागृतीची मोहीम राबविली. यावेळी वाहन चालकांना हेल्मेटचे महत्व पटवून देण्यात आले.

सदर जनजागृती कार्यक्रमाच्या वेळी सहायक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांनी याबाबत मार्गदर्शन केले. रस्ते अपघातांमध्ये मृत्यू होणाऱ्यांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण अधिक आहे. त्यातही हेल्मेट अभावी डोक्याला गंभीर दुखापत होऊन मृत्यू होणाऱ्यांची संख्या सर्वात अधिक आहे. मोटार वाहन कायद्यानुसार तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार सार्वजनिक ठिकाणी वाहन चालविताना हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. त्यामुळे देवरी येथील चिचगड रोड, अग्रसन चौक, बाजार चौक, येथे जनजागृतीची मोहीम राबविण्यात आली.

वाहन चालकांनी हेल्मेटचा वापर करावा. तसेच वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक पोलिस कर्मचारी निलेश जाधव यांच्यासह सहकाऱ्यांनी केली आहे.

Share