ब्रेकिंग: देवरीच्या अग्रसेन चौकातील बस थांबा आता त्रिमूर्तीनगर येथे,
देवरी◾️ येथील अग्रसेन चौकातील “श्री. महावीर राईस मील ” समोरील बस थांबा आमगांव रोड वरील त्रिमुर्तीनगर देवरी येथे हलविण्यात आलेला आहे. याबाबत वाहतुक निरीक्षक (प्रशिक्षण), रा प . भंडारा, यांचा दिनांक १०.०६.२०२३ रोजीचा अहवाला नुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने पत्र काढलेले असून देवरी आमगांव रोडवर असलेला श्री. महावीर राईस मील देवरी जि. गोंदिया ” च्या गेट समोर रा. प. बस थांबा असल्यामुळे राईस मील मालक यांना व प्रवाशांना अडचणी निर्माण होत असल्यामुळे देवरी आमगांव रोडवर श्री. महावीर राईस मील देवरी जि. गोंदिया येथे असलेला प्रवासी थांबा इतरत्र हलविणेबाबत विनंती करण्यात आली होती.
त्यानुसार वाहतुक निरीक्षक (प्रशिक्षण) यांना सदर थांब्याबाबत सर्वे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. वाहतुक निरीक्षक (प्रशिक्षण) यांनी त्यांचे अहवालात देवरी आमगांव रोडवरील जुना बस थांबा राईस मीलच्या बाजुला असून दुभाजक रोड तयार झाल्यामुळे आमगांव फाटयापासून नविन रोड (थांबा) त्रिमूर्तीनगर येथे तयार करण्यात आला आहे. त्यामुळे त्रिमुर्तीनगर आमगांव रोड देवरी येथे थांबा सुरू करण्यात यावा असा आशयाचा अहवाल दिलेला आहे.
दरम्यान देवरी आमगांव रोडवर असलेली ” श्री. महावीर राईस मील देवरी च्या गेट समोर रा. प. थांबा बंद करून आमगांव फाटा त्रिमूर्तीनगर येथे असलेला प्रवासी थांबा मंजुर करण्यात आला आहे. त्यामुळे अधिनस्त चालक/वाहक यांना आमगांव फाटा त्रिमूर्तीनगर देवरी जि. गोंदिया येथे बस थांबवून प्रवाशांची चढ/ उतार करण्याबाबतच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
त्यामुळे प्रवाशांनी आमगांव फाटा त्रिमूर्तीनगर येथे असलेला प्रवासी थांबा याचा प्रवासासाठी वापर करावा जेणेकरून गैरसोय होणार नाही.