देवरी: जलजीवन योजनेच्या कामाने रस्त्याचे बेहाल, कंत्राटदार आणि ग्रा.पं. प्रशासनाची उदासीन भूमिका

देवरी◾️तालुक्यातील सुरतोली ग्रामपंचायत अंतर्गत जलजीवन योजनेच्या कामाची सुरवात येन पावसाळ्याच्या तोंडावर करण्यात आली. जलजीवन योजनेच्या कामाची थाटात प्रसिद्धी करण्यात आली परंतु कंत्राटदार आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुके सुरतोली येथील रस्त्याचे तीन तेरा वाजले आहे.

सदर योजने अंतर्गत गावभर रस्ते तोडून नाल्या करण्यात आल्या आणि पाईपलाइन टाकण्यात आणि परंतु नाल्या फक्त माती टाकून बुजवल्यामुळे गावातील रस्त्यांचे बेहाल झाले अजून नागरिकांना येजा करण्याचे व रहदारी करण्याचे प्रश्न उभे झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार कंत्राटदाराने पाणीपुरवठा योजनेचे काम करीत असताना लोहारा ते टेकाबेदरला जाणाऱ्या लोहारा बसस्थानकाजवळील मुख्य रस्त्यावर पाइप खोदकाम करून त्यावर माती टाकण्यात आली परंतु त्या ठिकाणी सिमेंट काँक्रीट केले नाही. परिणामी मुख्य रहदारीच्या मार्गावर पावसाळ्यात शालेय विध्यार्थ्यांना शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

सदर समस्यावर सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी सुरतोली ग्रामपंचायतचे सरपंच मरसकोल्हे यांच्याशी संपर्क साधले असता सदर काम जिल्हा परिषदेच्या आहे. ग्रामपंचायतीला याबद्दल कुठलीच विचारणा करण्यात आली नसल्याचे सांगून सारवासारव करण्याचे उत्तर दिले.

गावातील नागरिकांच्या रस्त्यांच्या समस्या तात्काळ सोडवा, विद्यार्थी ,जेष्ठ नागरिक आणि महिलांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेऊन काम करा: दीपक पवार माजी जिप सदस्

Share