पुस्तक मैत्री संकल्पना राबविण्याची गरज

देवरी ◾️, पुस्तक मैत्री ही संकल्पना राबविण्याची आज गरज आहे. बालमनाचे मानसिक व शारिरीक आरोग्य चांगले राखण्यासाठी खेळ व वाचन अत्यंत महत्व असल्याचे प्रतिपादन उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर यांनी केले. उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय व चिचगड पोलिस ठाण्याच्या संयुक्त विद्यमाने 1 जुलै रोजी कृषी दिनानिमित्त आलेवाडा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. अप्पर पोलिस अधीक्षक बनकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.

ज्या होतकरु विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीमुळे शालेय पुस्तके घेणे शक्य नाही, अशा विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक वाटपाचा लाभ घेण्याचे आवाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आले होते. यातंर्गत आलेवाडा येथील इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना कृषी दिनाचे औचित्य साधून उपविभागीय पोलिस अधिकरी संकेत देवळेकर व चिचगडचे ठाणेदार शरद पाटील यांच्या हस्ते पुस्तकाचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना पुस्तकांचे जीवनातले महत्व काय आहे हे लक्षात आणून दिले. तसेच वाचनसंस्कृती वाढीसाठी भर देण्यासह शारीरिक सुदृढतेसाठी विविध ग्रामीण खेळाचे महत्व सांगून विद्यार्थ्यांसोबत विविध प्रकारचे सांघिक खेळ खेळण्याचा आनंद घेतला.

Print Friendly, PDF & Email
Share