देवरी🚨 अवैद्य दारू विक्री करणाऱ्याला केले ३ तालुक्यातून हद्दपार

Deori ◼️ पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे गोंदिया, अशोक बनकर अपर पोलीस अधीक्षक गोंदिया कॅम्प देवरी , संकेत देवळेकर सा. उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांच्या मार्गदर्शनात व सुचणेप्रमाणे प्रविण डांगे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन देवरी यांनी हद्दद्दीतील इसम नामे प्रकाश मन्साराम बन्सोड, रा. मुंडीपार, ता. देवरी. जिल्हा. गोंदिया हा पोलीस स्टेशन हददीमध्ये अवैध दारु विक्री करीत असल्याने सदरचे इसमांवर देवरी पोलीस स्टेशनला वारंवार गुन्हे दाखल करण्यात आले होते. तसेच त्याचेवर प्रतिबंधक कारवाई करुन त्याचे कडुन चांगले वर्तवणुकीसाठी मा. उपविभागीय दंडाधिकारी देवरी यांनी बंधपत्र देखील लिहून घेतलेले आहेत. तरीही त्याच्या वर्तवणुकीत कोणताही बदल झालेला नसुन त्याने त्याचे बेकायदेशीर कृत्यांची कृती चालुच ठेवलेली होती. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (अ) प्रमाणे त्याचे विरुध्द प्रस्ताव तयार करुन मा. उपविभागीय दंडाधिकारी देवरी यांचेकडे पाठविले असता सदर प्रकरणाची अनमोल सागर सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी देवरी यांनी चौकशी करुन व सुनावणी करुन दिनांक २६/०५/२०२३ रोजी नमुद इसमाला तालुका देवरी, तालुका आमगाव, तालुका सालेकसा या तालुक्याचे बाहेर हदपार केले आहे.

Share