देवरी तालुक्यातील ११ गावे सालेकसा पोलीस ठाण्यात, नागरिकांना कमालीचा त्रास

◼️कामानिमित्त करावा लागतो ३० किमीचा प्रवास

देवरी ◼️तालुक्यातून काही गावांचे विभाजन झाले. ती गावे देवरीला जोडण्यात आली. मात्र ती आणि आधीपासूनच देवरी तालुक्यात असलेली अशी ११ गावे अद्यापही सालेकसा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतात.

उल्लेखनीय म्हणजे, त्या गावांपासून सालेकसापासून देवरीचे अंतर कमी असताना देखील ती गावे अद्यापही सालेकसा तालुक्यातच येतात. त्यामुळे तेथील नागरिकांना पोलिस ठाण्याशी संबंधित कामाने येण्याकरिता श्रम, वेळ आणि पैसाही अधिक खर्च या उलट देवरी पासून फक्त १० किलोमीटर अंतरावर असल्याने नागरिकांच्या सोयी सुविधा लक्षात घेता पोलिस स्टेशन सालेकसा अंतर्गत असलेल्या देवरी तालुक्यातील ११ गावांचा समावेश देवरी पोलिस ठाण्यात समावेश करण्याची गरज आहे. या गावांना सालेकसा येथे जाण्याकरिता प्रवासी वाहनांची सोय नाही. शिवाय खासगी वाहने देखील साखरीटोला ते सालेकसा मार्गाने कमीच आहेत परिणामी त्या ११ गावातील नागरिकांनी पोलिस ठाण्याशी संबंधित कामानिमित्त येण्याकरिता मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

शासनाने त्या ११ गावांचा समावेश देवरी तालुक्यात करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर सालेकसा पोलिसांनी देखील गुन्ह्यांचा तपास कायदा आणि सुव्यवस्था पाळण्यासाठी अधिक अंतर कापून जावे लागते.

Print Friendly, PDF & Email
Share