कागदपत्र नसतांनाही वयानुरूप शाळा प्रवेश, खाजगी शाळाची शालेय फीस प्रलंबित

◼️शालेय शिक्षण विभागाचे आदेश, मुख्याध्यापक आले अडचणीत

गोंदिया ■ विद्यार्थ्यांकडे दाखला किंवा अन्य कागदपत्रे नसल्यास त्याला वयानुरूप ( इयत्ता आठवीपर्यंत) प्रवेश द्यावा, असे आदेश शालेय शिक्षण विभागाने काढले आहेत. शैक्षणिक शुल्क न भरल्याने दाखला देत नसल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्या. मात्र शाळा सोडल्याच्या दाखला न देण्याच्या कारणावरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकावर कारवाई करण्यात येणार असल्यामुळे मुख्याध्यापक संभ्रमात पडले आहेत.

इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. कोरोनाच्या काळात दोन वर्षांपर्यंत शाळा बंद राहिल्याने तत्कालीन शैक्षणिक वर्षाची शालेय फी अद्याप भरलेली नाही.

२०२२-२०२३ शैक्षणिक वर्षांतील शुल्क – देखील पूर्णपणे भरलेले नाही. अशात आता काही पालकांना त्यांच्या पाल्यास अन्य शाळांमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. पण पूर्वीची प्रलंबित फी भरल्याशिवाय शाळा सोडल्याच्या दाखला मिळणार नाही, त्यामुळे पालकांनी शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्या.

Print Friendly, PDF & Email
Share