नितीन गडकरी यांना धमकी देणाऱ्या जयेशच्या चौकशीसाठी एनआयएची टीम नागपुरात

नागपूर: केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना धमकी देणाऱ्या जयेश पुजारी उर्फ कांथा याची नागपूर पोलिसांकडून पुन्हा सखोल चौकशी सुरू झाली आहे. यासंदर्भात एनआयएची दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची टीम सुद्धा आज नागपूरात पोहचली. सध्या एनआयएचे हे अधिकारी नागपुरातील पोलीस जिमखाना येथे पोलीस आयुक्त अमितेशकुमार आणि सहकाऱ्यांकडून जयेश पुजारी कांथा बद्दल सखोल महिती घेत आहेत.

नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात सध्या जयेशला ठेवण्यात आलेले आहे. एनआयएचे अधिकारी या संदर्भात जयेशची, त्याच्या बेळगाव कारागृहत असलेल्या आणि कुख्यात दाऊद आणि इतर दहशतवादी संघटनांशी संपर्कात असलेल्या मित्रांची चौकशी करण्यासाठी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात देखील जाऊ शकतात, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

Print Friendly, PDF & Email
Share