एकही नागरिक शासकीय योजनेपासून वंचित राहू नये: माजी आमदार संजय पुराम

Deori ◼️क्षेत्राच्या विकासासाठी कटीबद्ध असून भारत सरकार व महाराष्ट्र सरकारच्या विविध जनउपयोगी योजना गरीब, शोषित, पीडित समाजाच्या उत्थानासाठी आहे. या योजनांपासून एकही लाभार्थी वंचित राहू नये यासाठी भाजप कार्यकर्ते व पदाधिकार्‍यानी प्रयत्न करावे, असे आवाहन माजी आमदार संजय पुराम यानी केले.

देवरी तालुक्यातील भोसा ग्रामपंचायत अंतर्गत बोदा रोड येथे राजकुमार वैद्य यांच्या घरापासून ते नीलकंठ मटाले यांच्या घरापर्यंत 10 लाख रूपयांच्या निधीतून तयार होणार्‍या सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन माजी आमदार संजय पुराम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीचे सभापती राजेंद्र गौतम, जिल्हा परिषद सदस्य हणवंत वट्टी, उपसभापती नोहरलाल चौधरी, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष सेवकराम ब्राम्हणकर, भाजपचे महामंत्री अनिरुद्ध शेंडे, बाजार समितीचे संचालक हुकूम बोहरे, माजी पस सदस्य विद्यासागर पारधी, भोसा ग्रामपंचायतचे सरपंच जैवंता मटाले, उपसरपंच श्रीकांत ब्राम्हणकर, ग्रामपंचायत सदस्य गुनेश्वर हत्तीमारे, सुनील ब्राम्हणकर, सावळराम मटाले, ताराबाई कोरे, संतकलाबाई मटाले, निर्मलाबाई शेंडे, अंजू कुरंजेकर, निलू शिवणकर, ग्रामसेवक अशोक बोरकर उपस्थित होते. याप्रसंगी मोठ्या संखेत पदाधिकारी, कार्यकर्ता व ग्रामस्थ उपस्थित होते.

Print Friendly, PDF & Email
Share