शार्ट सर्किटने गोंदिया जिल्हा परिषदेत आग 🔥!

गोंदिया◼️येथील जिल्हा परिषद कार्यालयात आग लागल्याची घटना आज बुधवार 24 मे रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली. घटनेमुळे जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली. आग विद्युत शार्ट सर्किटने लागल्याचे सांगितले जाते. या पूर्वीही जिल्हा परिषदेच्या कार्यालयात आगीच्या घटना घडल्या आहेत. या घटनेने मोठे नुकसान झाले नसले तरी जिल्हा परिषद कार्यालयाच्या विद्युत व्यवस्थेवर प्रश्न निर्माण केले जात आहे. जिल्हा परिषदेतील सर्वच कक्षांमध्ये काळोखाचे साम्राज्य पसरले आहे.

येथील विद्युत उपकरणांचा अधिक दाब विद्युत वायरिंगवर पडत असल्याने आगीच्या घटना दरवर्षी उन्हाळ्यात घडत असल्याचे बोलले जाते. आज बुधवारी नेहमीप्रमाणे सकाळी दहा वाजेनंतर अधिकारी कर्मचाऱ्यांची वर्दळ वाढली यानंतर सर्वच विभागातील पंखे, कुलर्स, वातानुकूलित यंत्र, संगणक संच भराभरा सुरू झाली. दरम्यान जिल्हा परिषदेला विद्युत पुरवठा करणाऱ्या मुख्य प्रवाहात शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. यामुळे उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांची अक्षरश: दानादान उडाली. आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्यामुळे ती विझवायची कशी? असा प्रश्न उपस्थित झाला विना विलंब. वीजतंत्रीला भ्रमणध्वनीवर संपर्क करून घटनास्थळी बोलाविण्यात आले. तत्पूर्वी काही कर्मचाऱ्यांनी आगीवर वाळू घालत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. पण ते सुद्धा अपुरे पडले. अखेर काही वेळातच वीजतंत्री ने घटनास्थळ गाठून उपस्थितांसह आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. सर्वांच्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. यानंतर मात्र संपूर्ण जिल्हा परिषदेत काळोख पसरला. काही वेळेनंतर विजतंत्रीने तात्पुरती व्यवस्था करून विद्युत पुरवठा पूर्ववत केला.

Print Friendly, PDF & Email
Share