देवरी कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपची सत्ता

◼️सभापती प्रमोद संगीडवार तर उपसभापती विजय कश्यप यांची निवड

देवरी◼️स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती निवडीसाठी आज, 24 मे रोजी समितीच्या सभागृहात सभा पार पडली. बाजार समितीत भाजपाचे सर्व 18 उमेदवार बिनविरोध निवडून आलयाने सभापतीपदीप्रमोद संगीडवार तर उपसभापती विजय कश्यप यांची निवड झाली.

Deori Bazar Committee

जिल्ह्यातील आठ बाजार समितीपैकी देवरी बाजार समितीमध्ये संचालकपदाची निवडणूक निर्विरोध झाली होती. यात भाजपचे सर्व 18 उमेदवार विविध गटातून बिनविरोध निवडून आले. यात प्रमोद संगीडरवार, विजय कश्यप, यादोराव पंचमवार, सुखचंद राऊत, श्रीकृष्ण हुकरे, अनिल बिसेन, कमल येरणे, बबलू डोये, द्वारकाप्रसाद धरमगुडे, गणेश भेलावे, शिवदर्शन भांडारकर, आसाराम पालीवाल, धनराज कोरोडे, दीपक अग्रवाल, अंशुल अग्रवाल, मारोती खंडारे, देवकी मरई व गोतमी तितराम या संचालकांचा समावेश आहे. दरम्यान, आज 24 मे रोजी सभापतीपदी प्रमोद संगीडवार यांची तर उपसभापती विजय कश्यप यांची निवड करण्यात आली.

Print Friendly, PDF & Email
Share