कृषी उत्पन्न बाजार समिती अर्जुनी मोरगाव वर महाविकास आघाडीचा कब्जा

Arjuni Mor : गोंदिया जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या मोरगाव अर्जुनी कृषी उत्पन्न बाजार समीतीवर महाविकास आघाडीने कब्जा केला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीचे प्रत्येकी 9 संचालक निवडणून आले होते. त्यामुळे 50-50 असे समीकरण असतांना भाजपचे 1 संचालक महाविकास आघाडीकडे आल्याने कृषी उत्पन्न बाजार सभापती पदावर यशवंत परशुरामकर तर उपसभापतीपदी अनिल दहिवले यांची निवड झाली आहे. 50-50 समीकरण असल्याने या बाजार समितीकडे संपूर्ण जिल्हावासीयांचे लक्ष लागले होते.

Print Friendly, PDF & Email
Share