पोलीस स्टेशन देवरी येथे जिएसएफ (स्किल इंडीया) सुरक्षा गार्ड रोजगार मेळावा संपन्न

पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत उपक्रम

देवरी ◼️कम्युनिटी पोलीससिंगच्या माध्यमाने दादालोरा खिडकी योजनेतेत पोलीस ठाणे देवरी मार्फत येथे सुरक्षा गार्ड भरती / रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. पोलीस अधिक्षक निखील पिंगळे यांच्या संकल्पनेतुन अपर पोलीस अधिक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन दादालोरा खिडकी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करता यावी या करिता गोंदिया जिल्हा पोलीस दल यांचे सौजन्याने दिनांक २३ / ५ / २०२३ रोजी जि एस एफ (स्किल इंडीया) च्या वतीने सुरक्षा गार्ड रोजगार शिबीर पोलीस स्टेशन देवरी येथे आयोजीत करण्यात आले होते. सदर रोजगार मेळाव्याला अपर पोलीस अधिक्षक अशोक बनकर गोंदिया कँप देवरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण डांगे यांनी भेट देवुन मार्गदर्शन केले. आयोजित मेळाव्याला अतिदुर्गम अतिदुर्गम आदिवासी नक्षल प्रभावित भागातील सुशिक्षीत बेरोजगाराचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. मेळावा मध्ये ५० ते ६० सुशिक्षीत बेरोजगार सहभाग घेतले होते. सदर रोजगार मेळाव्यामध्ये १० ते १२ सुशिक्षीत बेरोजगार जि. एस. एफ. (स्किल इंडीया) लि. मध्ये सुरक्षा गार्ड भरती करण्यात आले. सदर रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्या करीता पो.शि. दिनेश धर्मे / १५९ यांनी परिश्रम केले.

Print Friendly, PDF & Email
Share