होफ हाँस्पिटलच्या पुढाकाराने ककोडीत आरोग्य शिबिर उत्साहात

देवरी◼️ तालुक्यातील ककोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेंतर्गत मोठ्या गंभीर आरोग्याच्या सोयी रुग्णांना मिळाव्यात, याउद्देशाने नागपूर येथील होफ रुग्णालयाच्यावतीने निःशुल्क आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

ग्रामिण भागातील व्यक्तीला हृदयविकार, कर्करोग, हड्डीरोग, मुत्राशय, ट्यूमर सारख्या रोगांवर औषधोपचार व शस्त्रक्रियेसाठी मोठी रक्कम मोजावी लागते. कधी कधी ते शक्य नसल्यास जीव गमवण्याची वेळ सुध्दा येते. अश्या आवश्यक रूग्णांना नागपूर येथील होप हाँस्पिटलच्या पुढाकाराने शल्यचिकित्सा आणि उपचारासाठी निःशुल्क आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात 150 रुग्णांना औषधोपचार करण्यात आला. तसेच गरजू रुग्णांना शस्त्रक्रिया करण्यासाठी नागपुरात होप हाँस्पिटलमध्ये पाठविण्यात येणार आहे. शिबिरात होप हाँस्पिटलचे डॉ. सचिन गाठिबांधे, डॉ. सुरज गुप्ता, श्रीकांत भालेराव, समन्वय श़शांक उपगडे, व्यवस्थापक सुरज राजपुत, नर्स सिमरन कोकाटे, रुपाली यांनी आरोग्यसेवा दिली. त्यांना ककोडीचे आरोग्य अधिकारी डॉ. नंदिनी रामटेककर व त्यांच्या सहकारी आरोग्य कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.

Print Friendly, PDF & Email
Share