पोलिस ठाणा बदलविण्याकरीता भाजपची मागणी
देवरी – सदर देवरी तालुक्यातील अनेक गावे हे चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या सालेकसा पोलिस स्टेशन हद्दीत समाविष्ट असल्यामुळे देवरी तालुक्यातील नागरीकांना वारंवार होत असलेल्या मानसिक त्रासामुळे माजी आमदार संजय पुराम यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांना १९ मे शुक्रवारला निवेदन देण्यात आले आहे.
आमगाव – देवरी विधानसभा क्षेत्रात तीन तालुके समाविष्ट असून आमगाव आणि सालेकसा या दोन तालुक्यापैकी देवरी तालुका हा लोकसंख्येने व क्षेत्रफळाच्या दृष्टीने सुद्धा मोठा आहे. त्यामुळे देवरी तालुक्यातील उत्तर भागातील पुराडा, फुक्कीमेटा, मुरपार, डोंगरगाव, ओवारा, हरदोली अशा अनेक मोठ्या ग्राम पंचायत मधील गावे हे चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या सालेकसा पोलिस स्टेशन हद्दीत समाविष्ट आहेत. तर तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, इतर शासकीय कार्यालये, मोठाली बँक व बाजारपेठ तसंच दवाखाने हे सुद्धा सर्वच देवरी येथे आहेत.
त्यामुळे, कोणतीही नको ती वाईट घटना घडल्यास किंवा पोलिस स्टेशन कार्यालय संबंधित कामांसाठी नागरीकांना चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या सालेकसा येथे जावं लागत आहे.
या सर्व बिंदूवर विचार करुन नागरिकांची वेळ आणि मानसिक त्रास याची बचत म्हणून सदर गावे हे सालेकसा ऐवजी देवरी पोलिस स्टेशनला जोडण्यात यावेत, यासाठी माजी आमदार तथा भाजप महाराष्ट्र कार्यकारीणीचे सचिव संजय पुराम यांच्या नेतृत्वाखाली देवरी येथील अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांना निवेदन देण्यात आले आहे. जेणेकरुन अहवाल शासन दरबारी वरिष्ठांकडे जाऊन मागणी नक्कीच मंजूर होईल.
यावेळी भाजपचे पदाधिकारी तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रमोद संगीडवार, श्रीकृष्ण हुकरे, सुकचंद राऊत, यादोराव पंचमवार, गणेश भेलावे, प्रविण दहीकर, विनोद भांडारकर, विजय कश्यप, आसाराम पालीवाल, बबलू डोये, खंडारे, राजू शाहू , धनराज कोरोंडे, एकनाथ चुटे, देवकी मरई आणि गोमती तितराम यांची प्रमुख उपस्थिती होती.